गणराया, दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे!

दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव नाही; पुढील अधिवेशनात आमदार मांडणार भावना — सचिन अहिर

काशिनाथ शिंदे

पिंपरी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट आले असून, “गणराया, दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे,” अशी प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी केली आहे, असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.

भोसरी येथील सीआयइ ऑटोमेटिव्ह इंडिया लि. कंपनीच्या गणपतीची आरती गुरुवारी (दि. २४) सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार महेशदादा लांडगे, शिवसेना उपनेते व ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे, कंपनीचे अधिकारी विनायक कळसकर, निवृत्ती बच्छाव, बाळासाहेब पाटील, प्रशांत शर्मा, तसेच कामगार संघटनेचे पदाधिकारी कृष्णदेव थोरात, दीपक अरगडे, सुभाष जमादार, दत्तात्रय धावडे, ज्ञानेश्वर कळमकर आदी उपस्थित होते.

आरतीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सचिन अहिर म्हणाले की, महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. राज्य सरकारने या परिस्थितीची योग्य दखल घेतली असून, केवळ अहवालावर अवलंबून न राहता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या अडचणी व भावना जाणून घेतल्या जात आहेत.

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळाबाबत तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय जाहीर करतील. मात्र, दुष्काळाच्या प्रश्नावर स्वतंत्र विशेष अधिवेशन घेण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही. पुढील दीड ते दोन महिन्यांत अधिवेशन होणार असून, त्या अधिवेशनात आमदार दुष्काळाच्या प्रश्नावर आपल्या भावना मांडू शकतील, असे अहिर यांनी स्पष्ट केले.

काही भागांत धरणे भरली आहेत, तर काही भागांत पिके करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. हे संकट नैसर्गिक असून, सरकार शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याच्या भूमिकेत आहे, असेही त्यांनी सांगितले.

See also  "चाकणला मेट्रोची गती! पिंपरी-चिंचवड ते औद्योगिक पट्टा जोडणाऱ्या नव्या मार्गावर महा मेट्रोची निर्णायक बैठक"

“प्रत्येक शेतकऱ्याला आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे वाटते. त्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत,” असे अहिर म्हणाले.

दरम्यान, पक्षाच्या वतीने जालना, अमरावती आणि नागपूर येथे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रथम शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचवून त्यानंतर चारा छावण्या सुरू केल्या जातील. इतर पक्ष तसेच सामाजिक संस्थांनीही चारा छावण्या सुरू करण्यासाठी योगदान दिले असल्याचे अहिर यांनी सांगितले.

डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य

गणेशोत्सव काळात डीजेच्या वापरावर असलेल्या निर्बंधांबाबत विचारलेल्या प्रश्नावर सचिन अहिर म्हणाले की, उत्सव उत्साहात झाला पाहिजे; मात्र त्यासोबत परंपरेचेही जतन झाले पाहिजे.

“मी कामगारांचा प्रतिनिधी म्हणून दरवर्षी कामगारांसोबत भक्तिभावाने गणेशोत्सवात सहभागी होतो. माझ्या कामगार संघटनादेखील कोठेही डीजे न लावता पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणरायाची आराधना करतात,” असे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : क्रीडा संकुलातील साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात