३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी; ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ संपन्न

काशिनाथ शिंदे

पिंपरी: शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले. २८ आणि ३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, ज आणि ल या दहाही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील ३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. थेरगाव येथील स्व. कै. शंकरराव गावडे कामगार भवन येथेही शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात सफाई सेवकांची हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह आदींची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करणे, आरोग्यविषयक चांगल्या सवयी अंगीकारणे तसेच आजाराची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यास वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले.

सफाई मित्रांच्या आरोग्य-सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर

यावेळी बोलताना उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “सफाई सेवक हे शहराच्या स्वच्छतेतील महत्त्वाचे घटक आहेत. कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आरोग्याची नियमित तपासणी करून योग्य ती काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आरोग्यविषयक समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात आल्यास त्यावर वेळेत उपाययोजना करता येतात. त्यामुळे सफाई मित्रांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे.”

कचरा वेचकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले.

महिला व बालकल्याण योजनांचीही माहिती

शिबिराच्या माध्यमातून समाज विकास विभागाच्या महिला व बालकल्याण योजनांची माहिती देण्यात आली. महिला बचतगट, विधवा व घटस्फोटित महिलांसाठी स्वयंरोजगार, कौशल्य व व्यवसाय प्रशिक्षण तसेच विविध आर्थिक सहाय्य योजनांची माहिती देऊन पात्र महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

See also  गुन्हे शाखा युनिट-3ची उल्लेखनीय कामगिरी! आळंदीत 337 ग्रॅम गांजासह दोघे जेरबंद; स्कुटीसह 76 हजारांचा मुद्देमाल जप्त

“महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ गरजू आणि पात्र महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आर्थिक सहाय्य, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा या योजनांचा उद्देश आहे,” असेही डॉ. ठेंगल यांनी नमूद केले.

यावेळी डॉ. शिवाजी ढगे, डॉ. शंकर मोसलगी, डॉ. कुलभूषण कुलकर्णी, डॉ. तुषार जाधव, सहायक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजेश भाट, अंकुश झिटे, अतुल सोनवणे, कांचनकुमार इंदलकर, योगेश फल्ले तसेच आरोग्य निरीक्षक, संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि सफाई सेवक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार सहा. आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड यांनी मानले.

  • Related Posts

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    काशिनाथ पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री उशिरा अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सहा बांगलादेशी महिला आढळून आल्या असून,…

    वाढदिवसाच्या पार्टीसाठी लोणावळ्यात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

    सुकटा शिवारातील लोखंडी रॉडने केलेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सचिन उर्फ भैय्या जानकरला अटक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नभूम / धाराशिव : पवनचक्कीच्या वादातून सुकटा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर