महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन

काशिनाथ शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत अभिवादन करण्यात आले. उपमहापौर शर्मिला बाबर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, उपआयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा आग्रह धरत देशवासीयांना प्रेरणा दिली. असहकार आंदोलन आणि भारत छोडो आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला व्यापक जनाधार मिळवून दिला. त्यामुळे ते देशातील स्वातंत्र्यसैनिक आणि देशभक्तांसाठी प्रेरणास्थान ठरले.

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री हे थोर स्वातंत्र्यसैनिक, मुत्सद्दी राजकारणी आणि प्रखर देशभक्त म्हणून ओळखले जातात. देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदलाच्या पाठीशी संपूर्ण देशवासीयांनी ठामपणे उभे राहावे, असा संदेश देत त्यांनी देशवासीयांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना दृढ केली.

See also  ‘ड्रग-फ्री कॅम्पस’साठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा एल्गार!
  • Related Posts

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल…

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश