राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत चाकण कराटे अकादमीची दमदार कामगिरी

१२ खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी; १० सुवर्ण, ९ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई

चाकण : स्कूल ऑफ मार्शल आर्टच्या वतीने रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चाकण कराटे अकादमीच्या १२ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याची दमदार छाप पाडली.

स्पर्धेत चाकण कराटे अकादमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तब्बल २४ पदकांसह एक पारितोषिक पटकावले. यामध्ये १० सुवर्ण, ९ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.

या यशासाठी अकादमीचे प्रशिक्षक मयूर राजाराम शिंदे सर आणि श्रुतिका भानुदास पानसरे यांनी खेळाडूंना सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने स्पर्धेत सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.

खेळाडूंच्या या यशाबद्दल प्रशिक्षक मयूर शिंदे आणि श्रुतिका पानसरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांनी विद्यार्थ्यांवर दाखविलेला विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ ठरविणाऱ्या सर्व खेळाडूंचेही कौतुक होत आहे.

चाकण कराटे अकादमीच्या या यशामुळे अकादमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, आगामी स्पर्धांसाठी सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

See also  कलाकेंद्रातील वादाचा भयंकर शेवट; गर्भवती नर्तिकेची हत्या करून जंगलात जाळले
  • Related Posts

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    ५ कामांच्या करारासाठी लाचेची मागणी; १९ हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता प्रमोद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई