राजगडावर महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवली माणुसकी!

प्रकृती बिघडलेल्या पर्यटकाच्या मदतीसाठी पाच कर्मचारी धावले; रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

काशिनाथ शिंदे

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ला चढताना जिज्ञेश खंडाळकर (वय ३५) या पर्यटकाची प्रकृती अचानक बिघडल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता प्राथमिक माहितीतून व्यक्त करण्यात येत आहे. या कठीण प्रसंगी महावितरणच्या वेल्हा शाखेतील पाच कर्मचाऱ्यांनी तत्परतेने मदतीसाठी धाव घेत माणुसकीचे दर्शन घडवले.

राजगड किल्ल्यावरील वीजपुरवठा सुरळीत करून खाली उतरत असताना महावितरणचे कर्मचारी निलेश शेंडकर, रवींद्र कातूर्डे, राहुल भुरूक, शंकर रसाळ आणि चेतन चोरघे यांना पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी व स्थानिक नागरिक संबंधित पर्यटकाला किल्ल्यावरून खाली आणत असल्याचे दिसले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या पाचही कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. इतरांसोबत बचावकार्यात सहभागी होत त्यांनी खंडाळकर यांना किल्ल्यावरून खाली आणण्यासाठी प्रयत्न केले.

मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकी

वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य पार पाडल्यानंतर परतत असतानाही संकटात सापडलेल्या पर्यटकाच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या महावितरणच्या या पाचही कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

महावितरणचे कर्मचारी केवळ वीजसेवेचे सेवक नसून, संकटाच्या काळात नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे माणुसकीचे दूतही आहेत, याची प्रचिती या घटनेतून आली.

See also  मालमत्तेच्या वादातून रक्ताचे नाते संपवले! नातवाने आजीच्या गळ्यात खुपसला चाकू; नवी सांगवीत खळबळ
  • Related Posts

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : क्रीडा संकुलातील साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात