अभिजात मराठी भाषा सप्ताहात पाच माध्यम छायाचित्रकारांचा सन्मान; प्रदर्शनाला चार हजारांहून अधिक नागरिकांची भेट

काशिनाथ शिंदे

पिंपरी: अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनातून माध्यम छायाचित्रकारांच्या कलात्मक दृष्टिकोनाचा आणि निरीक्षणक्षमतेचा प्रभावी आविष्कार घडला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनात उत्कृष्ट छायाचित्रे सादर करणाऱ्या पाच माध्यम छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रदर्शनाला चार हजारांहून अधिक नागरिकांनी भेट देत छायाचित्रकलेचा आनंद घेतला.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी विविध वृत्तपत्रांमध्ये कार्यरत असलेल्या छायाचित्रकारांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या कलात्मक योगदानाचा गौरव करण्यात आला.

यामध्ये ‘सकाळ’चे रितेश छब्रिबन, ‘सामना’चे दत्ता अडागळे, ‘लोकमत’चे अतुल मारवाडी, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सचिन फुलसुंदर आणि ‘पुढारी’चे मिलिंद कांबळे यांचा समावेश होता.

या वेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे व्यवस्थापक विकास वेताळ, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, सरचिटणीस हिरा सरवदे, उपाध्यक्ष किशोर बारकूले आणि सदस्य तुषार झरेकर यांच्यासह शहरातील पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाचित्रांतून उलगडले सामाजिक-सांस्कृतिक जीवन

या प्रदर्शनात माध्यम छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या विविध घटना, प्रसंग आणि सामाजिक-सांस्कृतिक विषयांचे प्रभावी चित्रण करण्यात आले होते. छायाचित्रांच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनातील विविध पैलू उलगडत नागरिकांना घटनांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळाली.

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने छायाचित्रकलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम लक्षवेधी ठरला. प्रदर्शनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांमध्ये छायाचित्रकलेविषयी असलेली आवड अधोरेखित करणारा ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कुंभार आणि सुहास जोशी यांनी केले.

चौकट : प्रदर्शनाला चार हजारांहून अधिक नागरिकांचा प्रतिसाद

See also  महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव हाच खऱ्या सन्मानाचा पाया!

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला चार हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. माध्यम छायाचित्रकारांनी टिपलेले विविध क्षण, घटना आणि प्रसंग यांचा कलात्मक आविष्कार नागरिकांना अनुभवता आला. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद छायाचित्रकलेची लोकप्रियता अधोरेखित करणारा ठरला.

  • Related Posts

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : क्रीडा संकुलातील साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात