पश्चिम महाराष्ट्रातून ११ हजार भाविक दसरा मेळाव्याला जाणार!

सदाशिव खाडे यांची माहिती; सावरगाव घाट येथे २० ऑक्टोबरला भव्य मेळावा

काशिनाथ शिंदे

पिंपरी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी गेल्या तीन दशकांपासून दसरा मेळाव्याच्या माध्यमातून बहुजन, वंचित आणि ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे समाजोपयोगी कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत लोकनेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनीही बहुजन, वंचित आणि शोषित घटकांचा आवाज बुलंद करण्याची परंपरा कायम राखली आहे. यंदा मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा होणार असून, पश्चिम महाराष्ट्रातून सुमारे ११ हजार अनुयायी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मेळाव्याचे समन्वयक आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिली.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून अन्यायग्रस्त, वंचित आणि कष्टकरी समाजाला आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हीच परंपरा पुढे सुरू ठेवत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा मेळावा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि अन्य राज्यांतील राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे भक्त तसेच गोपीनाथ मुंडे यांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांतून ११ हजार अनुयायी मेळाव्यासाठी सावरगाव घाट येथे जाणार आहेत. या मेळाव्याच्या नियोजनासाठी पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भगवान सेना प्रदेश पदाधिकारी व पंचायत समिती सदस्य अशोक मुंडे, नगरसेवक अपूर्व खाडे, योगिता नागरगोजे, माजी उपमहापौर केशव घोळवे, प्रा. रवी खेडकर, सुनील बांगर, दीपक नागरगोजे, अनंत कांदे, पवन जाधवर, डॉ. ज्ञानोबा मुंडे, कैलास केकाने, गणेश ढाकणे, कैलास सानप, भागवत मुंडे, रघुनंदन घुले, एस. नाकाडे, राहुल खाडे, राहुल नागरगोजे, रामदास कावळे, संजय बढे, डॉ. महेश गर्जे, बबन गर्जे, नामदेव सारुक आणि अण्णा गर्जे आदी उपस्थित होते.

See also  २० वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर फरार आरोपी परळीतून जेरबंद!

राष्ट्रसंत भगवान बाबांच्या विचारांना अभिवादन

‘बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी’ या संदर्भाचा उल्लेख विविध ग्रंथांमध्ये आढळतो. राष्ट्रसंत भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरीचे वाचन केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यांच्या जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक भगवान बाबांचे महान कार्य, विचार आणि समाजप्रबोधनाची परंपरा यांची आठवण करून देणारे प्रेरणास्थान आहे.

राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा आणि जातीभेदांविरोधात जनजागृती केली. समाजप्रबोधनासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या महान संतांच्या विचारांचा जागर दसरा मेळाव्यातून केला जातो. त्यामुळे भाविकांनी आणि अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रसंत भगवान बाबांना अभिवादन करावे, असे आवाहन सदाशिव खाडे यांनी केले आहे.

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर