ग्रंथांच्या आधारावर कौशल्य सिद्ध करा; ग्रंथ विश्वासार्हता देतात! – डॉ. मीनल ओक

एसबीपीआयएममध्ये वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना स्वतंत्र लेखन, वाचन आणि संवाद कौशल्य विकसित करण्याचे आवाहन

काशिनाथ शिंदे

पिंपरी : सध्याचा काळ हा कौशल्य आणि गुणवत्तेला महत्त्व देणारा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि संवाद कौशल्य विकसित करून स्वतःची गुणवत्ता वाढवली पाहिजे. उच्च शिक्षण घेताना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) किंवा गुगलवर अवलंबून न राहता ग्रंथालयातील संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा. ग्रंथांमुळे ज्ञानाला विश्वासार्हता मिळते, शब्दसंग्रह समृद्ध होतो आणि प्रभावी संवाद साधण्याचा आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन आयएमसीसीच्या प्रा. डॉ. मीनल ओक यांनी केले.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या.

डॉ. ओक म्हणाल्या की, एमबीए आणि पीएच.डी.सारखे उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता, ज्ञान आणि कौशल्य सिद्ध करावे लागते. यासाठी विषयाचा सखोल अभ्यास, संदर्भग्रंथांचे वाचन आणि स्वतःच्या विचारांतून मूळ लेखन करणे आवश्यक आहे. संवाद साधताना तांत्रिक भाषा आणि पारिभाषिक शब्दांचा योग्य वापर केल्यास सादरीकरण अधिक प्रभावी होते.

एआयचा वापर करा, पण वाङ्मयचौर्य टाळा!

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विविध अनुप्रयोगांचा वापर संदर्भ मिळवण्यासाठी सहाय्यक म्हणून करता येतो. मात्र, त्यातील मजकूर जशाच्या तसा उतरवून वापरण्याऐवजी स्वतःच्या अभ्यासातून आणि विचारांतून लेखन करावे. दुसऱ्याच्या लिखाणाची नक्कल करून ते स्वतःच्या नावावर सादर करणे म्हणजे वाङ्मयचौर्य होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतंत्र लेखनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही डॉ. ओक यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात ग्रंथवाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला.

See also  चिंचवडमध्ये एमडीचा ७.७४ लाखांचा साठा जप्त; कारसह आरोपी अटकेत!

यावेळी एसबीपीआयएमच्या संचालक व प्राचार्य डॉ. कीर्ती धारवाडकर, शैक्षणिक प्रमुख डॉ. रूपाली कुदरे, संशोधन व विकास विभागाचे प्रमुख डॉ. भूषण परदेशी, डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. स्वप्नील सोनकांबळे आणि डॉ. अमरीश पद्मा उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या आयोजनात ग्रंथपाल स्वाती सातपुते आणि सहाय्यक ग्रंथपाल अनघा कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. विद्यार्थी आर्या सरदेशपांडे आणि ओम माळी यांनी सूत्रसंचालन केले.

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर