अश्विन नवरात्रोत्सवानिमित्त पारंपरिक कौटुंबिक संस्कारांचे पालन; शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
काशिनाथ शिंदे
लोणावळा श्री एकवीरा देवीच्या चरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या परिवाराच्या वतीने अश्विन नवरात्रोत्सवानिमित्त पारंपरिक कौटुंबिक संस्कारांचे पालन करत ओटी अर्पण करण्यात आली. देवीच्या दर्शनासह श्रद्धा आणि भक्तिभावाने हा धार्मिक विधी पार पडला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, कळंबोली विभागप्रमुख राजेश केनी आणि महेंद्र दुबे उपस्थित होते.
दरम्यान, दादरचे आमदार महेश सावंत यांनीही आपल्या परिवारासह श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची श्रद्धापूर्वक उपस्थिती पाहायला मिळत आहे.







