पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर; रस्ते सुरक्षेसाठी महापालिकेची मोहीम!

बीआरटी मार्गावरील रेलिंग व दुभाजकांची स्वच्छता; उत्कृष्ट काम करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांचा सन्मान करणार – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

काशिनाथ शिंदे

पिंपरी:  पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील बीआरटी रेलिंग आणि दुभाजकांची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेकडून मैलाशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या टँकरमार्फत हे काम सुरू असून, या स्वच्छतेसाठी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात नाही. जलसंवर्धनासोबतच रस्ते सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाळ्यामुळे रस्त्यांवरील चिखल, माती आणि धूळ बीआरटी रेलिंग व दुभाजकांवर साचली आहे. त्यामुळे रेलिंगचा रंग, दुभाजकांच्या कडा आणि त्यावरील परावर्तक पट्टे झाकले जात असून, वाहनचालकांना ते स्पष्टपणे दिसण्यात अडथळे निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून रेलिंग व दुभाजकांची स्वच्छता करण्यात येत आहे.

स्वच्छता ही केवळ शहराच्या सौंदर्यीकरणापुरती मर्यादित नसून, ती रस्ते सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाची देखभाल आहे. दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, शालेय वाहने, सार्वजनिक वाहतूक आणि इतर वाहनचालकांना रस्त्यावरील संरक्षक व्यवस्था स्पष्टपणे दिसावी, हा या कामामागील प्रमुख उद्देश आहे.

संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय

नुकतीच बीआरटी रेलिंगला स्कूल बसची धडक लागल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर रेलिंग व दुभाजकांची दृश्यता कायम ठेवणे आणि संभाव्य धोकादायक ठिकाणांची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेकडून या कामाला प्राधान्य दिले जात आहे.

आगामी ‘पुणे ग्रँड टूर-२०२७’ सायकल स्पर्धेच्या तयारीच्या अनुषंगाने संबंधित बीआरटी मार्गांची स्वच्छता व देखभाल करण्यात येत आहे. मात्र, हे काम केवळ स्पर्धेपुरते किंवा शहराच्या सुशोभीकरणापुरते मर्यादित नसून, नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची सुरक्षितता लक्षात घेऊन नियमित देखभालीचाही भाग म्हणून राबविण्यात येत आहे.

See also  ‘सैराट’चा बदला! प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीच्या पतीवर कोयत्याने हल्ला; पिस्तूल निसटल्याने जीव वाचला

पाणी बचत आणि पुनर्वापर करणाऱ्या संस्थांचा सन्मान

शहरातील पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचवेळी सार्वजनिक रस्त्यांची स्वच्छता आणि सुरक्षिततेची कामेही नियमितपणे करणे गरजेचे आहे. या दोन्ही बाबींचा समतोल राखण्यासाठी महापालिकेकडून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि सहकारी गृहनिर्माण संस्था पाणीटंचाईवरील उपाययोजनांसाठी उत्तम सहकार्य करीत आहेत. पाणी बचत तसेच पाण्याचा पुनर्वापर यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना महापालिकेच्या वतीने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा, पाण्याची बचत करावी आणि महापालिकेच्या स्वच्छता व रस्ते सुरक्षिततेच्या कामांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

– बापुसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

  • Related Posts

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : क्रीडा संकुलातील साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात