स्वच्छ दिवाळी, हरित दिवाळी! अडगळ फेकू नका, आर.आर.आर. केंद्रात द्या!

पुनर्वापरातून गरजूंना मदतीचा हात; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नागरिकांना आवाहन

काशिनाथ शिंदे

पिंपरी : दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करताना वापरात नसलेल्या; मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू कचऱ्यात फेकण्याऐवजी त्या गरजूंपर्यंत पोहोचविण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध प्रभागांमध्ये ‘आर.आर.आर.’ (रिड्यूस, रियुज, रिसायकल) केंद्रे सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी या केंद्रांमध्ये वस्तू जमा करून ‘स्वच्छ दिवाळी, हरित दिवाळी’ उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

घरातील जुनी खेळणी, कपडे, पुस्तके, वह्या, भांडी, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे अशा अनेक वस्तू वापरात नसल्यामुळे फेकून दिल्या जातात. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढते आणि सार्वजनिक स्वच्छतेवरही परिणाम होतो. मात्र, या वस्तू सुस्थितीत असल्यास त्यांचा पुनर्वापर करून त्या गरजू व्यक्तींच्या उपयोगी आणता येतात. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आर.आर.आर. केंद्रांचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

पुनर्वापरातून स्वच्छतेला हातभार

महापालिकेच्या या उपक्रमामुळे अनावश्यक वस्तू कचऱ्यात जाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर गरजू नागरिकांना उपयोगी वस्तू उपलब्ध होऊन सामाजिक बांधिलकीही जपली जाणार आहे. पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि वस्तूंचा पुनर्वापर यांची सांगड घालणाऱ्या या उपक्रमात नागरिक आणि गृहसंकुलांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

महापालिकेचे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले की, आर.आर.आर. केंद्रांचा उपक्रम हा स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. घरातील वापरात नसलेल्या; मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू या केंद्रांमध्ये जमा केल्यास त्यांचा पुनर्वापर होऊन त्या गरजू व्यक्तींच्या उपयोगी येतील. विशेषतः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराची साफसफाई करताना अशा वस्तू फेकून न देता केंद्रांमध्ये जमा कराव्यात. लोकसहभागातूनच स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड शहर घडविणे शक्य आहे.

See also  विरोधकांना निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण आठवली; खा. संजय राऊत

कोणत्या वस्तू जमा करता येतील?

आर.आर.आर. केंद्रांमध्ये पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, सुस्थितीतील कपडे, चादरी, पडदे, खेळणी, शैक्षणिक साधने, घरगुती साहित्य, भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला आणि पुनर्वापर करता येण्याजोग्या अन्य वस्तू जमा करता येतील.

शहरातील आर.आर.आर. केंद्रांची ठिकाणे

प्रभाग १ ते ८ : वृंदावन, चिखली (प्रभाग १); संत सावता महाराज उद्यान, मोशी (प्रभाग २); मोशी चौक (प्रभाग ३); दिघी जकात नाका (प्रभाग ४); राजमाता जिजाऊ उड्डाणपूल, भोसरी (प्रभाग ५ व ७); धावडे वस्ती, भोसरी (प्रभाग ६); संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, पिंपळे गुरव (प्रभाग ८).

प्रभाग ९ ते १६ : हेगडेवार क्रीडा संकुल, अजमेरा (प्रभाग ९); कापसे उद्यान, मोरवाडी (प्रभाग १०); भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान (प्रभाग ११); रूपीनगर पोलीस चौकी (प्रभाग १२); शनि मंदिर, सेक्टर २१ (प्रभाग १३); आकुर्डी भाजी मंडई (प्रभाग १४); संत तुकाराम महाराज उद्यान (प्रभाग १५); धर्मराज चौक, रावेत (प्रभाग १६).

प्रभाग १७ ते २४ : एसकेएफ कंपनीशेजारी, थेरगाव (प्रभाग १७); हेगडेवार पूल, दर्शननगरी (प्रभाग १८); श्रीधरनगर उद्यान (प्रभाग १९); छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई, संत तुकाराम नगर (प्रभाग २०); पिंपरी गाव बसथांबा (प्रभाग २१); ज्योतिबा उद्यान, काळेवाडी (प्रभाग २२); थेरगाव रुग्णालयाशेजारी, जगताप नगर (प्रभाग २३); मोरू बारणे उद्यान, थेरगाव (प्रभाग २४).

प्रभाग २५ ते ३२ : तानाजी कलाटे उद्यान, वाकड (प्रभाग २५); ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, पिंपळे निलख (प्रभाग २६); आरोग्य कोठी, रहाटणी गावठाण (प्रभाग २७); लिनियर उद्यान, कोकणे चौक (प्रभाग २८); प्रभाग कार्यालय क्रमांक २९; सितांगण उद्यान (प्रभाग ३०); कै. काळुराम जगताप तलाव (प्रभाग ३१); जुनी सांगवी भाजी मंडई (प्रभाग ३२).

वस्तू जमा करण्यासाठी संपर्क साधा

नागरिकांनी तसेच गृहसंकुलांनी घरातील वापरात नसलेल्या, मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू पुनर्वापरासाठी द्याव्यात. वस्तू संकलित करण्यासाठी ७०३०९०१९९३ / ९१६८६८४६७० या क्रमांकांवर संपर्क साधावा. जुन्या वस्तूंचा योग्य वापर करून गरजूंना मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  दिघीत संस्कारांचा महासोहळा! गुरु पूजन, मातृ-पितृ पाद्य पूजनाने भारावले वातावरण

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका : स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. घरातील सुस्थितीतील वस्तू आर.आर.आर. केंद्रांमध्ये जमा केल्यास त्या गरजू व्यक्तींच्या उपयोगी आणता येतील. यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल. दिवाळीनिमित्त नागरिकांनी वस्तू फेकून न देता पुनर्वापरासाठी द्याव्यात आणि या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.

कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका : आर.आर.आर. केंद्रांच्या माध्यमातून जुन्या वस्तूंना नव्याने उपयोगात आणण्याची संधी उपलब्ध होत आहे. या उपक्रमातून पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक संवेदनशीलतेलाही चालना मिळणार आहे. नागरिक आणि गृहसंकुलांनी पुनर्वापराची सवय अंगीकारून स्वच्छ, सुंदर व शाश्वत शहराच्या निर्मितीसाठी सहकार्य करावे.

  • Related Posts

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : क्रीडा संकुलातील साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६…

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    सायबर पथकाची तत्पर कारवाई; बँक आणि मर्चंटकडे पाठपुरावा करून मिळवले पैसे काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे (प्रतिनिधी) : अनोळखी लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये संशयास्पद ॲप डाउनलोड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    जंजिरा किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून मनोज जरांगेंना दोन दिवसांचा अल्टिमेटम; भरतभाऊ ओव्हाळांचा काळे फासण्याचा इशारा!

    जंजिरा किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून मनोज जरांगेंना दोन दिवसांचा अल्टिमेटम; भरतभाऊ ओव्हाळांचा काळे फासण्याचा इशारा!