गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून सापळा रचून कारवाई; तपास पथकाला यश
काशिनाथ शिंदे
पुणे : मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या नामदेव हनुवती राऊत (वय ३६, रा. साई चौक, वडगाव बुद्रुक, पुणे) याला मार्केट यार्ड पोलिसांच्या तपास पथकाने खेड-शिवापूर परिसरातून ताब्यात घेतले. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
आरोपी नामदेव राऊत याच्याविरुद्ध मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो गेल्या महिनाभरापासून फरार होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनीता नवले आणि पोलीस उपनिरीक्षक राजे महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कारवाई केली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर, पोलीस शिपाई बालाजी शिंदे (बक्कल क्रमांक ८९६५), पोलीस हवालदार महिबुब नदाफ (बक्कल क्रमांक ७२७२), पोलीस हवालदार दत्तात्रय राऊत (बक्कल क्रमांक ४०९४), पोलीस शिपाई दिनेश माने (बक्कल क्रमांक १०२८५), पोलीस हवालदार महेश जेधे (बक्कल क्रमांक ९६३) आणि पोलीस हवालदार कौस्तुभ जाधव (बक्कल क्रमांक ६८५) यांचा समावेश होता.
गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईमुळे फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास पथकाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.







