पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर! ताथवडेतील विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छ शहराचा संदेश

ओला-सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्ती आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती

काशिनाथ शिंदे

पिंपरी: स्वच्छ आणि सुंदर शहराच्या निर्मितीसाठी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळेत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, सार्वजनिक स्वच्छता आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रभावी संदेश देत नागरिकांचे लक्ष वेधले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळेत पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.

या पथनाट्यात विद्यार्थ्यांनी ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करणे, रस्त्यावर कचरा न टाकणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. स्वच्छ शहर घडविण्याची जबाबदारी केवळ महापालिका प्रशासनाची नसून, प्रत्येक नागरिकानेही त्यासाठी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरांत

लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजविणे आणि त्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे नियम पाळल्यास परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यास मदत होते, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

या उपक्रमाला ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने आणि आरोग्य निरीक्षक कोमल फर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.

महापालिकेच्या वतीने नागरिकांना कचऱ्याचे ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी घेऊन हाताळावयाचा कचरा अशा चार प्रकारांत वर्गीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. वर्गीकृत कचरा महापालिकेच्या घंटागाडीला देणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे या सवयी प्रत्येकाने अंगीकाराव्यात, असेही सांगण्यात आले.

See also  "अण्णाभाऊंच्या विचारांना सलाम... टिळकांच्या राष्ट्रभक्तीला अभिवादन! देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात प्रेरणादायी संयुक्त सोहळा"

स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका : “स्वच्छ आणि सुंदर शहराच्या निर्मितीसाठी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजविल्यास त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबावर आणि समाजावरही होतो. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि प्लास्टिकचा वापर टाळणे यांसारख्या सवयी प्रत्येकाने अंगीकाराव्यात. स्वच्छ शहर घडविण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा.”

डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका : “स्वच्छतेच्या सवयी लहान वयातच रुजल्यास त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण समाजावर होतो. विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचवावा. ओला व सुका कचरा वेगळा करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या बाबींचे प्रत्येकाने दैनंदिन जीवनात पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहराची निर्मिती शक्य आहे.”

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर