रावेतमध्ये ३.१८ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघांना अटक

पहाटेच्या सुमारास पोलिसांची कारवाई; १०६ ग्रॅम मेफेड्रॉन हस्तगत

काशिनाथ शिंदे

रावेत: रावेत परिसरात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले ३ लाख १८ हजार रुपये किमतीचे १०६ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ रावेत पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी पहाटे २.३५ वाजण्याच्या सुमारास रावेत बीआरटी रस्त्यालगत, सेलेस्टियल सिटी सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील किडझी प्री-स्कूलच्या मागील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी संशयितांकडे मेफेड्रॉन असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून अंमली पदार्थांचा साठा जप्त केला.

या प्रकरणी चैतन्य श्याम कांबळे (वय २०) आणि कैलाश देवजी चौधरी (वय २६) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १०६ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारातील किंमत ३ लाख १८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा

अटक केलेल्या दोघांविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा स्रोत, त्याची विक्री आणि या प्रकरणातील संभाव्य सहभाग याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.

See also  राज्याच्या भरती परीक्षांचा ‘परीक्षा पॅटर्न’ बदलणार?
  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर