उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्यासह मान्यवरांनी अर्पण केले पुष्पहार
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर ऋषी, आदिकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीसह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्य प्रशासकीय इमारतीतील कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सहआयुक्त मनोज लोणकर, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे माजी उपाध्यक्ष ॲड. सागर चरण, सामाजिक कार्यकर्ते राजेश बडगुजर, सोमनाथ बेद, विष्णू चावरिया, राहुल चावरिया, नरेश गुहर, अशोक वाल्मिकी, अनिल लखण, प्रकाश सौदा, ओमप्रकाश सौदा, मुकेश बंदमड, सुशील खैरालिका आणि सुनील चटोले यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अनुराधा गोरखे, वर्षा जगताप, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, उपअधीक्षक डॉ. मनीषा सूर्यवंशी, भूलतज्ज्ञ डॉ. मारुती गायकवाड, नोडल अधिकारी डॉ. छाया शिंदे, मेट्रन वत्सला वाजे, स्वाती कुलकर्णी, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, आरोग्य सहाय्यक मोहन वाघमारे तसेच अभिषेक फुगे, नंदू कानडे, प्रेमकुमार रेनवा आणि निलेश बहुले आदी उपस्थित होते.
महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.







