पुणेकरांच्या वाहतूक कोंडीवर भूमिगत उपाय! ३१ किलोमीटरचे दोन भव्य बोगदे उभारण्याची तयारी; ‘पाताळ लोक’ प्रकल्पाला हिरवा कंदील

भोसरी ते उंड्री आणि भूगाव ते एरंडवणे असे दोन मार्ग प्रस्तावित; पुणे-पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

काशिनाथ शिंदे

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता भूमिगत मार्गांचा पर्याय पुढे आला आहे. पुणे महानगरपालिकेने ‘पाताळ लोक’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत तब्बल ३१ किलोमीटर लांबीचे दोन भुयारी मार्ग उभारण्याची प्राथमिक तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्यास महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंजुरी दिली आहे.

शहरातील वाढती वाहनसंख्या, अपुरे रस्ते आणि दररोजच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पाची घोषणा केली होती.

दोन भुयारी मार्गांचे नियोजन

सुरुवातीला येरवडा ते कात्रज असा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, व्यवहार्यतेच्या अडचणींमुळे हा पर्याय बाजूला ठेवण्यात आला. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने टॉमटॉम डेटा, गुगल वाहतूक माहिती आणि वाहनांच्या प्रवास पद्धतींचा अभ्यास करून दोन नवीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

पहिला मार्ग : भोसरी ते उंड्री (२३ किलोमीटर)

भोसरी, संगमवाडी, धोबीघाट आणि कोंढवा मार्गे उंड्रीला जोडणारा सुमारे २३ किलोमीटरचा हा भुयारी मार्ग असेल. शहराच्या उत्तर भागाला थेट दक्षिण भागाशी जोडण्याची क्षमता या मार्गात आहे. आगामी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीनेही हा मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो.

दुसरा मार्ग : भूगाव ते एरंडवणे (८ किलोमीटर)

राम नदी परिसरातील भूगाव ते डुक्कर खिंडमार्गे एरंडवणे डी. पी. रोड असा सुमारे आठ किलोमीटरचा दुसरा भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. यामुळे पुण्याच्या पश्चिम भागातील वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून डुक्कर खिंड परिसरातील भौगोलिक अडथळा पार करणे शक्य होईल.

See also  रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

मेट्रो, रिंगरोड आणि बससेवेचे एकात्मिक जाळे

हा प्रकल्प केवळ दोन स्वतंत्र बोगद्यांपुरता मर्यादित नसून शहरातील रिंगरोड, उड्डाणपूल, मेट्रो आणि पीएमपीएमएल बससेवा यांच्याशी त्याची सांगड घालण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांतील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अनेक यंत्रणांच्या समन्वयाची गरज

या प्रकल्पाचा संबंध पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच संरक्षण मंत्रालयाच्या कार्यक्षेत्राशी येतो. त्यामुळे विविध यंत्रणांचा समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे.

सध्या हा प्रकल्प प्राथमिक नियोजनाच्या टप्प्यावर आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता आणि पर्यावरणीय मंजुरी या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे ३१ किलोमीटरच्या या भुयारी मार्गांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीला मोठा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

  • Related Posts

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले आकाशकंदील अन् रंगविले दिवे; विक्रीतून मिळालेला निधी अनाथाश्रम आणि दिव्यांग संस्थेला भेट काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे: शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये…

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीचा उपक्रम; मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड: देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या