एकच गेम वाजवणार, अख्खा जिल्हा गाजवणार!’ आरोपीच्या रिल्स व्हायरल; गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार का?

पोलिस बंदोबस्तातील न्यायालयीन नेण्याच्या व्हिडिओंना आक्रमक ऑडिओची जोड; वाळूज पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

काशिनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आरोपीच्या दोन रिल्स सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांच्या बंदोबस्तात संबंधित आरोपीला न्यायालयात घेऊन जातानाचे व्हिडिओ वापरून त्यावर ‘एकच गेम वाजवणार, अख्खा जिल्हा गाजवणार’ असा आक्रमक ऑडिओ लावण्यात आला आहे.

या रिल्समुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, समाजमाध्यमांवर अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण केले जात असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या कारवाईचे व्हिडिओ वापरून आरोपीची दहशत किंवा दबदबा दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, या दोन्ही रिल्सची वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून दखल घेतली जाणार का? संबंधित व्हिडिओ तयार करणारे आणि प्रसारित करणाऱ्यांची चौकशी होणार का? तसेच कायद्याच्या चौकटीत आवश्यक ती कारवाई केली जाणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

आता या व्हायरल रिल्सप्रकरणी वाळूज पोलिस कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

See also  बालस्वरांपासून अजय-अतुलच्या सुरांपर्यंत रंगली अभिजात मराठीची सांगीतिक मैफल
  • Related Posts

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले आकाशकंदील अन् रंगविले दिवे; विक्रीतून मिळालेला निधी अनाथाश्रम आणि दिव्यांग संस्थेला भेट काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे: शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये…

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीचा उपक्रम; मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड: देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या