वैजापूर पोलीस ठाण्यासमोरच पोलिसांना शिवीगाळ! राजू थाटेवर कारवाईची मागणी; युवराज दाखले आक्रमक

पोलीस स्टेशनसमोरच पोलिसांचा अपमान होत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा?’; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

काशिनाथ शिंदे

पिंपरी : वैजापूर पोलीस ठाण्याच्या बाहेर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना खुलेआम शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोरच पोलिसांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने कायद्याचा धाक नेमका कुठे राहिला, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन राजू थाटे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी लोकसेवक युवराज दाखले यांनी केली आहे.

पोलीस बांधव दिवस-रात्र जनतेच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावत असतात. अशा कर्मचाऱ्यांना भररस्त्यात आणि पोलीस ठाण्यासमोर शिवीगाळ करणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. हा प्रकार केवळ संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचा अपमान नसून संपूर्ण पोलीस दलाच्या प्रतिष्ठेवर आघात करणारा असल्याचे दाखले यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे, एवढा गंभीर प्रकार घडूनही अद्याप ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस ठाण्यासमोरच पोलिसांचा अपमान होत असेल आणि त्यावर कारवाई होत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या घटनेचा अखिल भारतीय हिंदू मातंग संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शिवशाही शासन पक्ष आणि अखिल भारतीय हिंदू मातंग संघाच्या वतीने संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज दाखले यांनी राजू थाटे यांच्याविरोधात तातडीने चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांच्या सन्मानासाठी आंदोलनाचा इशारा!

पोलीस दलाचे मनोबल टिकवणे आणि कायद्याचा धाक कायम ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही हयगय न करता निष्पक्ष चौकशी व नियमानुसार कारवाई करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही युवराज दाखले यांनी दिला आहे.

See also  फॅन्सी नंबर प्लेट, बेकायदा सायलेन्सरला वाहतूक पोलिसांचा दणका

पोलीस बांधवांच्या सन्मानासाठी आणि न्यायासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

  • Related Posts

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले आकाशकंदील अन् रंगविले दिवे; विक्रीतून मिळालेला निधी अनाथाश्रम आणि दिव्यांग संस्थेला भेट काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे: शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये…

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीचा उपक्रम; मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड: देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या