डांगे चौकातील घड्याळ दुकानफोडीचा पर्दाफाश! दोन चोरटे जेरबंद; १०८ महागडी घड्याळे हस्तगत

१५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासणीतून आरोपींचा माग काढला; वाकड पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ९.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे

थेरगाव येथील डांगे चौक परिसरातील घड्याळाचे दुकान फोडून लाखो रुपयांची महागडी घड्याळे चोरणाऱ्या दोन चोरट्यांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दुकानातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीनच चोरून नेल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. मात्र, परिसरातील तब्बल १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून पोलिसांनी आरोपींचा माग काढत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. आरोपींकडून चोरीची १०८ महागडी घड्याळे, गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिवा दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण ९ लाख ८४ हजार ७७० रुपयांचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

थेरगाव येथील डांगे चौकाजवळ असलेल्या ‘लाले चष्मेवाले अँड वॉचेस’ या दुकानात ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ ते ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान चोरीची घटना घडली होती. चोरट्यांनी दुकानाच्या छतावरील पत्रे उचकटून तसेच पीओपी फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सुमारे ८ लाख २३ हजार ७०१ रुपये किमतीची घड्याळे आणि डीव्हीआर मशीन चोरून नेले होते. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०७, ३३१ (३), ३३१ (४) आणि ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डीव्हीआर चोरी करूनही पोलिसांच्या नजरेतून सुटले नाहीत!

चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीनच पळविल्याने तपासात अडथळा निर्माण झाला होता. मात्र, वाकड पोलिसांच्या तपास पथकाने हार न मानता घटनास्थळाच्या परिसरातील १५० ते २०० सरकारी आणि खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींच्या येण्या-जाण्याचा मार्ग शोधून त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. आरोपी अॅक्टिवा दुचाकीवरून पसार झाल्याचेही तपासात स्पष्ट झाले.

See also  सराईत 'बिल्ला'च्या मुसक्या आवळल्या! पिस्टल अन् जिवंत काडतूसासह देहूरोड पोलिसांची धडक कारवाई

घड्याळे विक्रीसाठी येताच पोलिसांचा सापळा!

चोरीची घड्याळे विक्री करण्यासाठी एक संशयित काळाखडक, वाकड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे यांनी पथकासह सापळा रचला. या कारवाईत अमिर शब्बीर शेख (वय २८, रा. भीमाशंकर कॉलनी, आदर्शनगर, किवळे) याला १० नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्याने साथीदार इरफान हमीद मुलानी (वय २१, रा. मुस्लिम वाडा, पद्मावती मंदिरामागे, उर्से, ता. मावळ) याच्या मदतीने दुकानफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दुसऱ्या आरोपीला त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता अटक करण्यात आली.

१०८ घड्याळांसह संपूर्ण मुद्देमाल जप्त

पोलीस कोठडीत आरोपींकडे केलेल्या चौकशीनंतर त्यांच्याकडून टायटन, टायटन रागा, टायटन एज आणि फास्टट्रॅक या कंपन्यांची ९ लाख ४ हजार ७७० रुपये किमतीची १०८ महागडी घड्याळे हस्तगत करण्यात आली. याशिवाय ५० हजार रुपये किमतीची अॅक्टिवा दुचाकी आणि ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ९ लाख ८४ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव (परिमंडळ-२) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे (वाकड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे तसेच पोलीस अंमलदार दळे, वंदू गिरे, विजय घाडगे, विजय भुसारे, मोहम्मद नदाफ, सचिन गायकवाड, विजय मोरे, कौतेंय खराडे, ज्ञानदेव झेंडे, कारभारी पालवे, विक्रम भगत, समाधान कांबळे, प्रमोद गायके, अभिषेक मांडे आणि मंगेश लोखंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.

  • Related Posts

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    ४.९२ लाखांचे २४.६३ ग्रॅम मॅफेड्रॉन हस्तगत; रिक्षा, मोबाइल आणि रोख रकमेसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : गुलटेकडी येथील मार्केटयार्ड परिसरात अमली…

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    मोशीतील इंद्रायणी नदीच्या तीरावर विश्व श्रीराम सेनेच्या छटपूजा महोत्सवात भक्तीचा जनसागर; १५ हजार भाविकांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये सूर्यनारायणाच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक