महावितरणच्या संचालकांनी वीज कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी; कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचे केले कौतुक

महावितरणच्या संचालकांनी वीज कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी; कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचे केले कौतुक

काशिनाथ शिंदे

पिंपरी : दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी पिंपरी विभागातील गणेशाम वीज उपकेंद्राला सदिच्छा भेट देत तेथील वीज कर्मचाऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. सणासुदीच्या काळातही नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी औंढेकर यांनी उपकेंद्रातील लाइनमन आणि यंत्रचालकांशी संवाद साधत त्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी जाणून घेतल्या. वीजबिलांची शंभर टक्के वसुली, वीजगळती कमी करणे आणि ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणे या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

वीज यंत्रणेतील बिघाड, त्यावरील उपाययोजना आणि स्थानिक परिस्थितीची अचूक माहिती प्रत्यक्ष काम करणाऱ्या लाइनमनला असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास महावितरणच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणता येऊ शकतात, असे औंढेकर यांनी स्पष्ट केले.

दिवाळीच्या काळात सर्वत्र आनंदोत्सव सुरू असताना नागरिकांच्या घरात प्रकाश कायम राहावा, यासाठी महावितरणचे कर्मचारी स्वतःच्या सणाचा आनंद बाजूला ठेवून कर्तव्य बजावत असतात. भाऊबीजेच्या दिवशीही कुटुंबीयांपासून दूर राहून जनसेवेला प्राधान्य देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची दखल घेत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही भेट असल्याचे त्यांनी सांगितले.

या भेटीमुळे वरिष्ठ अधिकारी आणि प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानदेव तरंगे यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

See also  फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा
  • Related Posts

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले आकाशकंदील अन् रंगविले दिवे; विक्रीतून मिळालेला निधी अनाथाश्रम आणि दिव्यांग संस्थेला भेट काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे: शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये…

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीचा उपक्रम; मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड: देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या