मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या आठ कुटुंबांना हक्काची घरे; आयुक्तांचे आदेश जारी

यशवंतनगरमधील एसआरए प्रकल्पात मोफत सदनिकांचे वाटप; प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदतही यापूर्वीच प्रदान

काशिनाथ शिंदे

पिंपरी: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला गमावलेल्या आठ कुटुंबांना अखेर हक्काचा निवारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना पिंपरी येथील यशवंतनगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) प्रकल्पातील आठ सदनिकांचे मोफत वाटप करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

मोशी येथील महापालिकेच्या कचरा डेपोमध्ये ८ जुलै २०२६ रोजी झालेल्या दुर्घटनेत नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि कायमस्वरूपी निवारा देण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली होती. त्यानुसार २ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या महापालिका सभेत मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोफत सदनिका देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

आता ५ नोव्हेंबर २०२६ रोजी मान्य झालेल्या प्रस्तावानुसार आठ कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना सदनिका वाटपाचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये दिवंगत राहुल धोंडिबा गायकवाड यांच्या पत्नी अश्विनी राहुल गायकवाड, महेश सुरेश कुंभार यांच्या पत्नी शिवुबाई महेश कुंभार, अक्षय राजू सावंत यांच्या पत्नी हर्षदा सुरेश बने, वामन दगडू कसबे यांच्या पत्नी सुनीता वामन कसबे, सनी अशोक माने यांच्या पत्नी कांचन सनी माने, सुनील भारत कोरके यांच्या पत्नी पल्लवी सुनील कोरके, भावेश मोहन वाणी यांच्या पत्नी मोहिनी भावेश वाणी आणि रणजित जयवंत पाटील यांच्या आई छाया जयवंत पाटील यांचा समावेश आहे.

दरम्यान, मृत नागेश गायकवाड यांच्या कायदेशीर वारसांच्या कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नाही. आवश्यक कागदपत्रे सादर झाल्यानंतर त्यांनाही सदनिका देण्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उर्वरित एका कुटुंबालाही घर मिळण्याचा मार्ग खुला राहणार आहे.

See also  अमित डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी वाहतूक पोलिसांचा दणका!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाने या प्रक्रियेसाठी कार्यवाही केली. संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येणार आहे.

प्रत्येकी १० लाखांची मदतही दिली

महापालिका प्रशासनाने केवळ घरांचा निर्णय घेतला नाही, तर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करून त्याचे वाटपही केले आहे. आता मोफत सदनिकांच्या निर्णयामुळे या कुटुंबांना आर्थिक मदतीसोबतच कायमस्वरूपी निवाऱ्याचाही आधार मिळणार आहे.

महापालिका प्रशासन कुटुंबीयांच्या पाठीशी

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाची महापालिका प्रशासनाला पूर्ण जाणीव आहे. या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आर्थिक मदतीसोबतच हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले की, नऊ कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदनिका देण्याचे नियोजन आहे. त्यापैकी एका कर्मचाऱ्याच्या वारसांकडून कागदपत्रांची पूर्तता झालेली नसल्याने सध्या आठ सदनिकांचे वाटप आदेश जारी करण्यात आले आहेत. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा दिला जाणार आहे.

दुर्घटनेत कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांना आर्थिक मदतीनंतर आता हक्काचे घर मिळणार असल्याने महापालिकेचा हा निर्णय त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

  • Related Posts

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले आकाशकंदील अन् रंगविले दिवे; विक्रीतून मिळालेला निधी अनाथाश्रम आणि दिव्यांग संस्थेला भेट काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे: शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये…

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीचा उपक्रम; मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड: देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या