चिखली घरकुलच्या धर्तीवर आदर्श वसाहतीची संकल्पना; समाजसेवा आणि विकासाचा नवा आदर्श
काशिनाथ शिंदे : कोल्हापूर
निळ पण : समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि विकासाची तळमळ मनात ठेवून कार्य करणारे निळवंचं गावचे सुपुत्र तथा युवा उद्योजक युवराज नीलवर्ण मुळके हे परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहेत. निराधार, गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात देतानाच चिखली घरकुलच्या धर्तीवर आदर्श वसाहतीची संकल्पना पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय ठरत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील निळ पण गावचे सुपुत्र असलेल्या युवराज मुळके यांनी सामाजिक कार्याला प्राधान्य देत समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे. विशेषतः निराधार आणि गरजू नागरिकांना सातत्याने मदतीचा हात देत त्यांनी अनेकांना आधार देण्याचे काम केले आहे. त्यामुळे परिसरात त्यांची ओळख निराधारांचे आधार अशी निर्माण झाली आहे.
निळ पण येथील घरकुल परिसरात वास्तव्यास असलेले युवराज मुळके हे चिखली घरकुलच्या धर्तीवर आदर्श वसाहतीची संकल्पना साकारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परिसराचा नियोजनबद्ध विकास, नागरिकांमधील एकोपा, परस्पर सहकार्य आणि सामाजिक सलोखा यांना महत्त्व देत आदर्श सोसायटी कशी असावी, याचा आदर्श निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्वतःच्या व्यवसायासोबतच सामाजिक कार्यालाही प्राधान्य देणाऱ्या युवराज मुळके यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
निळ पण गावचे सुपुत्र म्हणून आपल्या गावाची आणि परिसराची ओळख सामाजिक कार्यातून उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.







