शेतकऱ्यांच्या घरातून खाकीचा चौकार! किवळच्या चार युवकांची मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलात दमदार निवड

: काशिनाथ शिंदे मसूर,

कऱ्हाड तालुक्यातील किवळ गावाने पुन्हा एकदा अभिमानाची भरारी घेतली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील चार होतकरू युवकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील पोलिस दलांमध्ये निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राज्यभरातील हजारो उमेदवारांमधील तीव्र स्पर्धेत अक्षय विजय साळुंखे आणि आदित्य संजय साळुंखे यांनी मुंबई शहर पोलिस दलात स्थान मिळवले. तर सुयोग शिवाजी थोरात याने पुणे कारागृह पोलिस दलात यश संपादन केले असून समाधान अर्जुन कोळी याची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निवड झाली आहे.

शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांत उत्कृष्ट कामगिरी करत या चारही युवकांनी आपल्या जिद्दीची आणि मेहनतीची प्रचिती दिली. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध दिनचर्या, नियमित सराव आणि कुटुंबीयांचे भक्कम पाठबळ यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले.

विशेष म्हणजे, किवळ गावात गेल्या चार ते पाच वर्षांपासून दरवर्षी चार ते पाच युवक-युवतींची पोलिस दल, लष्कर तसेच विविध शासकीय सेवांमध्ये निवड होत आहे. त्यामुळे गावात स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवांविषयी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून अनेक तरुण-तरुणी यशाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

या चारही युवकांच्या यशामुळे किवळ गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

See also  'आझाद मैदान'च्या रणशिंगाला सरकारचा प्रतिसाद!; शिक्षकांच्या टप्पा वाढीवर तातडीची बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!