देहूरोडमध्ये आज अण्णाभाऊ साठे जयंतीचा जल्लोष; विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन आणि सांस्कृतिक कार्यक्रम

काशिनाथ शिंदे : देहूरोड

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त बहुजन विकास आघाडीच्या वतीने देहूरोड येथे शनिवारी (दि. १ ऑगस्ट) विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजक संजय धुतडमल यांनी ही माहिती दिली.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात तसेच शंकर मंदिराजवळील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित उद्यानात मुख्य अभिवादन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत, प्रशासक ॲड. कैलास पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अंभोरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजाराम अस्वरे, संजय साठे, प्रतीक धुतडमल, कोमल शिंदे, कैलास वारके, आनंद साळवे आणि लखन धुतडमल यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

See also  अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त लांडेवाडीत समाजसेवेचा जागर! रक्तदान शिबिर, महापुरुषांना अभिवादन आणि 'ममता फाउंडेशन'चे उद्घाटन
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!