खेडमध्ये हातभट्टी साम्राज्यावर पोलिसांचा बुलडोझर; १,५०० लिटर रसायन नष्ट

काशिनाथ शिंदे : खेड  

अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दारूबंदी युनिटने मोठी धडक कारवाई करत खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव परिसरातील हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल १,५०० लिटर कच्चे रसायन, ३५ लिटर तयार हातभट्टी दारू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दारूबंदी युनिटचे पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस नाईक गोनटे, पोलीस शिपाई गुट्टे, खेडकर, महिला पोलीस शिपाई बेंजरपे आणि चालक पोलीस शिपाई गर्जे यांचे पथक परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उत्तर चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओढ्यालगतच्या भागात छापा टाकण्यात आला.

१७ जून रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास म्हाबरे वस्ती, रामनगर, दौंडकर वाडी (शेल पिंपळगाव), ता. खेड येथे करण्यात आलेल्या या कारवाईत दोन इसम हातभट्टी दारू निर्मितीसाठी लागणारे पदार्थमिश्रित रसायन साठवून ठेवत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रद्युम्न बिरबल राठोड आणि राहुल राजू धनगर (दोघेही रा. दौंडकर वाडी, शेल पिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांचा समावेश आहे.

कारवाईदरम्यान सुमारे ५२ हजार ५०० रुपये किमतीचे १,५०० लिटर कच्चे रसायन, ३५ लिटर हातभट्टी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध उत्तर चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२३, ३(५) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ब), ६५ (ई) आणि ६५ (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारूबंदी युनिटच्या या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या धंद्याला मोठा आळा बसला असून पुढील तपास उत्तर चाकण पोलीस करीत आहेत.

See also  राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणासाठी पुण्यात प्रादेशिक प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ स्थलांतर, कर्जबाजारीपणा आणि कृषी कुटुंबांच्या स्थितीचा अभ्यास; धोरणनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण माहिती संकलित होणार
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!