रावेतमध्ये दागिने हिसकावणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका

काशिनाथ  शिंदे .पिंपरी, दि. १७ जून : रावेत परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत चैन स्नॅचर टोळीचा रावेत पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने आणि चोरीची दुचाकी असा एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी कविता मिलिंद केसरकर (वय ५५) या २ जून २०२६ रोजी सायंकाळी पतीसोबत फिरत असताना नव्यम कन्स्ट्रक्शन साईटजवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण हिसकावून नेले होते.

या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. पोलीस शिपाई अजित बेंडभर व विनोद कदम यांनी आरोपींना ताब्यात घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

तपासादरम्यान आदित्य परशुराम मनलोर (वय १९, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) आणि फिदा मनुआली इराणी (वय ३५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) यांनी दुचाकी क्रमांक KA-38-EA-8929 चा वापर करून रावेत परिसरात दोन चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून रावेत पोलीस ठाण्यातील दोन चैन स्नॅचिंग प्रकरणांतील १ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच कर्नाटकातील बिदर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरी प्रकरणातील एक लाख रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली. अशा प्रकारे एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तपासात आरोपींनी हिंजवडी, तळेगाव दाभाडे, विश्रांतवाडी तसेच बिदर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतही गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. आदित्य मनलोर याच्याविरुद्ध यापूर्वी मोबाईल स्नॅचिंग आणि चैन स्नॅचिंगचे सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

See also  मंदिरफोड्या टोळीचा ४८ तासांत पर्दाफाश! देवीचा १.२५ किलो चांदीचा मुकुट, रोख रक्कम जप्त; तीन मंदिर चोरीचे गुन्हे उघड

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे, संतोष कोळगे, आशिष बोटके, गोविंद चव्हाण, विनायक मराठे, प्रदीप गायकवाड, अजित बेंडभर, सौदागर लामतुरे, विनोद कदम व निखील कपले यांच्या पथकाने केली.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली.

  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!