नियमभंगाविरुद्ध कठोर कारवाई करणाऱ्या अमित डोळस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न?

वाहतूक नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई; सोशल मीडियावर अपप्रचार केल्याप्रकरणी तक्रार

काशिनाथ शिंदे | पिंपरी 

पिंपरी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी अमित डोळस यांनी वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू ठेवली असताना, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका वाहनचालकावर कारवाई केल्यानंतर संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडीओ प्रसारित करून डोळस यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी अमित डोळस हे १३ मे २०२६ रोजी कार्यालयीन कामकाज करत असताना विभागासमोर काळ्या फिल्म लावलेल्या वाहनाची नोंद झाली. चौकशीदरम्यान संबंधित वाहन हे अॅड. प्रज्वल दुबे यांचे असल्याचे समोर आले. वाहनावर नियमबाह्य काळी फिल्म आढळून आल्याने मोटार वाहन कायद्यानुसार ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

तक्रारीनुसार, कारवाईदरम्यान संबंधित व्यक्तीने आपण माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगत कारवाईस विरोध केला. मात्र, नियम सर्वांसाठी समान असल्याची भूमिका घेत अमित डोळस यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने मोबाईलवर चित्रीकरण करून तसेच व्हॉट्सॲप स्टेटस आणि फेसबुकवर काही पोस्ट प्रसारित करून डोळस यांच्याबाबत अपमानास्पद व बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी दाखल केलेल्या निवेदनात, वाहतूक शिस्तीची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याला लक्ष्य करून वैयक्तिक बदनामी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या लागू कलमांनुसार तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त निर्माण करण्यासाठी आणि नियमभंग करणाऱ्यांवर निर्भीडपणे कारवाई करण्यासाठी अमित डोळस हे ओळखले जातात. कोणताही दबाव न मानता कायद्याची अंमलबजावणी करण्याची त्यांची भूमिका यामुळेच चर्चेत असते. या प्रकरणामुळे नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष्य करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

See also  खेडमध्ये हातभट्टी साम्राज्यावर पोलिसांचा बुलडोझर; १,५०० लिटर रसायन नष्ट

दरम्यान याबाबत अॅड. प्रज्वल दुबे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ती प्राप्त झाल्यास बातमीत सामाविष्ट केली जाईल.

Related Posts

दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!