सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पांनी स्वागत

काशिनाथ शिंदे/पिंपरी 

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे स्वागत संस्मरणीय करण्यासाठी सिद्धीविनायक पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस आनंद, उत्साह आणि उत्सुकतेच्या वातावरणात पार पडला. शाळा परिसर आकर्षक फुलांची सजावट, विविध रंगांच्या रांगोळ्या आणि बलूनच्या तोरणांनी सजविण्यात आला होता.

शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करून तसेच गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही उत्साहाने सहभागी झाले होते.

कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा   निर्मला जाधव आणि सचिव  मारुती जाधव यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे नवागत विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय ठरला. विद्यार्थीही मोठ्या आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाले आणि नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झाली.

See also  प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान