वाहन हस्तांतरण ठप्प; चालक-मालक महासंघाचे नितीन गडकरींकडे साकडे

काशिनाथ शिंदे : नागपूर

हायर परचेस नोंदणी-बोजाउतरवणीची कामेही रखडली; हजारो वाहनचालक-मालकांना फटका

नागपूर : महाराष्ट्रातील वाहन हस्तांतरणाची प्रक्रिया गेल्या तीन आठवड्यांपासून पूर्णपणे ठप्प असल्याने हजारो वाहनचालक व वाहनमालकांची कामे रखडली आहेत. वाहन हस्तांतरणासह हायर परचेस नोंदणी आणि हायर परचेस बोजाउतरवणीची कामेही बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्याची मागणी करत महाराष्ट्र राज्य चालक-मालक प्रतिनिधी महासंघ आणि मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.

गेल्या तीन आठवड्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात वाहन हस्तांतरणाची प्रक्रिया ठप्प असल्याने वाहन खरेदी-विक्री व्यवहारांवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. तसेच हायर परचेस नोंदवणे आणि बोजा उतरवण्याची प्रक्रिया बंद असल्यामुळे वाहनधारक, चालक, मालक तसेच संबंधित व्यवसायिकांची मोठी गैरसोय होत आहे.

या समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत आणि वाहन हस्तांतरणासह हायर परचेस नोंदणीबोजाउतरवणीची प्रक्रिया त्वरित पूर्ववत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य चालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे सर्वेसर्वा बाबासाहेब शिंदे, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजू घाटोळे, महासंघाचे पदाधिकारी बापू भावे, विक्रांत विरंगुळकर, निलेश ढवळे, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे प्रसिद्धीप्रमुख विनोद वरखडे आणि सोशल मीडिया प्रमुख सुरज देवकर यावेळी उपस्थित होते.

“हजारो वाहनचालक-मालकांची रोजीरोटी आणि नागरिकांची महत्त्वाची कामे वाहन हस्तांतरण प्रक्रियेवर अवलंबून आहेत. त्यामुळे हा तांत्रिक अथवा प्रशासकीय अडथळा तातडीने दूर करून महाराष्ट्रातील वाहन व्यवहार सुरळीत करावेत,” अशी भूमिका प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडली.

See also  एकवीरा रोपवेविरोधात ग्रामस्थ आक्रमक; जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!