कोंढवा पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! ४८ तासांत दोन कारवाया; ८ लाखांचा अमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त

हायड्रोपोनिक गांजा आणि एमडीसह दोघे जेरबंद; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल

काशिनाथ शिंदे

पुणे  शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कोंढवा पोलिसांनी धडक कारवाई सुरू ठेवली असून, अवघ्या ४८ तासांत दोन स्वतंत्र कारवाया करत हायड्रोपोनिक गांजा आणि एमडी (मेफेड्रोन) असा सुमारे ८ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली कारवाई ३१ ऑगस्ट २०२६ रोजी कोंढवा येथील अजमेरा पार्क परिसरातील एल.के. अपार्टमेंटसमोर करण्यात आली. संशयास्पदरीत्या थांबलेल्या अमीर अकबर शेख (वय ३६) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता १४९ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. त्याच्याकडून रोख रक्कम, एक वाहन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण ५ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, त्यापूर्वी २८ ऑगस्ट २०२६ रोजी कोंढवा परिसरातील ‘पॅराडाईज इन लॉज’च्या रूम क्रमांक ४०५ वर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत अजीम सलीम शेख (वय ३७) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १२.१० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर, रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि इंजेक्शनच्या सिरिंज असा सुमारे २ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी अमली पदार्थांचा साठा जप्त करत आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. कोंढवा परिसरात अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

अवघ्या ४८ तासांत दोन कारवाया आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त झाल्याने कोंढवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी मोहिमेला वेग आल्याचे दिसून येत आहे.

See also  रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर १९ जणांवर गुन्हा; सोशल मीडिया पोस्टप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!