कृषी विभागात विधी अधिकाऱ्याची ‘एन्ट्री’; २१ सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत

काशिनाथशिंदे

पुणे, कृषी विभागाच्या पुणे विभागांतर्गत पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील न्यायालयीन प्रकरणांचा प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी एका विधिज्ञाची अथवा विधी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांनी २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज साद करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (खंडित कालावधी) तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज हाताळण्यासाठी ही नियुक्ती करण्यात येणार आहे. अर्जदार हा महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलमध्ये नोंदणीकृत आणि वैध वकिली परवाना असलेला वकील असणे आवश्यक आहे.

उमेदवाराला उच्च न्यायालय खंडपीठ, जिल्हा न्यायालय तसेच राज्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे किमान १० वर्षांचा न्यायालयीन कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच अपघात विमा, नागरी दावे, नुकसानभरपाई आणि तत्सम प्रकरणांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. शासकीय किंवा सार्वजनिक संस्थांच्या वतीने न्यायालयीन प्रकरणे हाताळल्याचा अनुभव असल्यास त्यासही प्राधान्य राहणार आहे.

खटल्यांनुसार मिळणार मानधन

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने निर्धारित केलेल्या दरपत्रकानुसार विधी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातील प्रति खटला ५० हजार रुपये, तर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील प्रति प्रकरण १० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. या मानधनामध्ये खटल्याचे वाचन, अर्ज तयार करणे, प्रतिवादाची तयारी, इतर शुल्क, सुनावणीच्या तारखांना उपस्थिती तसेच खटल्याशी संबंधित अन्य कामांचा समावेश असेल.

अर्जासोबत अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, वकिली परवाना क्रमांक व प्रमाणपत्राची प्रत, शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, न्यायालयीन कामकाजाचा अनुभव, विशेषतः अपघात विमा व नागरी दाव्यांशी संबंधित अनुभवाची माहिती जोडणे आवश्यक आहे. शासकीय कामकाजाचा अनुभव असल्यास त्याची प्रमाणपत्रेही सादर करावी लागतील. याशिवाय पारपत्र आकाराचे छायाचित्र, शासनाच्या वतीने दाखल केलेल्या न्यायालयीन प्रकरणांची यादी आणि शासनाच्या बाजूने निकाल लागलेल्या प्रकरणांची यादी अर्जासोबत जोडावी.

See also  पिंपरी-चिंचवडच्या 'रेड झोन' प्रश्नावर दिल्लीत खलबते; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे नागरिकांच्या न्यायासाठी जोरदार पाठपुरावा

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज विभागीयकृषीसहसंचालककार्यालय,पुणेविभाग,पद्मश्रीसभागृह,दुसरामजला,कृषी आयुक्तालय मध्यवर्ती इमारत, पुणे या पत्त्यावर सादर करावेत. अपूर्ण अर्ज तसेच अपात्र उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. उमेदवाराची पात्रता आणि विभागाची आवश्यकता लक्षात घेऊन अंतिम नियुक्ती केली जाणार असून, अर्ज स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार विभागाकडे राहणार असल्याचे जेजुरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!