पुणे मंडळाच्या घरांसाठी उत्पन्न निकषात शिथिलता; दोन वर्षांपैकी एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य

२०२४-२५ किंवा २०२५-२६ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला सादर करता येणार

काशिनाथ शिंदे: पुणे

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या १५ टक्के सामाजिक आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनांमधील सदनिकांच्या वितरणासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. अर्जदारांच्या अडचणी लक्षात घेऊन आता मागील दोन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

या संदर्भातील जाहिरात २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्याच दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्जदारांनी उत्पन्नाचा पुरावा म्हणून तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे.

यापूर्वी मंडळाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, अनेक अर्जदारांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्र भरले असले तरी ते अलीकडील असल्यामुळे आयकर विभागाकडून त्याचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे. परिणामी ऑनलाइन अर्ज भरताना अर्जदारांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

ही बाब लक्षात घेऊन मंडळाने उत्पन्न निकषात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ किंवा २०२५-२६ यापैकी कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न अर्जासाठी ग्राह्य धरले जाणार आहे.

अर्जदारांनी या बदलाची नोंद घेऊन उपलब्ध कागदपत्रांनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पुणे गृहनिर्माणक्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजी आढळराव पाटील यांनी केले आहे.

See also  🌱 'वाढदिवसाचा अनोखा संकल्प! उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी वृक्षारोपणासह धार्मिक विधींना सुरुवात'
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!