एमडी-अफीम तस्करीवर पोलिसांचा घणाघात; दोघे जेरबंद!

भोसरी-मोशी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ७१.७२० ग्रॅम एमडी, १०८.७३० ग्रॅम अफीमसह ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

 

काशिनाथ शिंदे

 

पिंपरी-चिंचवड,  शहरात  अंमली पदार्थांची अवैध विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोशी परिसरात सापळा रचून एमडी (मेफेड्रॉन) आणि अफीम तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या. या कारवाईत तब्बल ७१.७२० ग्रॅम एमडी आणि १०८.७३० ग्रॅम अफीम, दोन मोबाईल, डिजिटल वजनकाटा आणि दुचाकीसह एकूण ४ लाख ३० हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आकाश कुमार भेराराम बिश्नोई (वय २१, रा. दुर्गापार्क, सस्तेवाडी, मोशी, मूळ राजस्थान) आणि प्रविण कुमार हिराराम बिश्नोई अशी आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक शहरात गस्त घालत असताना पोलीस हवालदार विजय दौंडकर यांना एमडी व अफीम तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास देहू-मोशी रोडवरील बोराटेवस्ती, मोशी येथील महालक्ष्मी फर्निचर दुकानासमोर सापळा रचला.

 

पोलिसांनी संशयित हालचालींवर लक्ष ठेवत कारवाई केली असता आकाश बिश्नोई याच्याकडून ७१.७२० ग्रॅम एमडी, तर प्रविण बिश्नोई याच्याकडून १०८.७३० ग्रॅम अफीम हस्तगत करण्यात आले. दोघेही अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थ बाळगत व वाहतूक करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

 

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८(क), १७(ब), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अंमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता, तसेच या तस्करीच्या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत.

See also  पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यांना आंबेगाव पोलिसांचा दणका; तिघांना अटक, १.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

 

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

 

नागरिकांनी माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन

 

शहरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी ७७९८१००११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!