खनिजबाधित भागांच्या विकासासाठी आमदार शंकर जगताप यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी!

जिल्हा खनिज प्रतिष्ठान, पुणेच्या नियामक परिषदेत पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती

काशिनाथ शिंदे

पिंपरी,  चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ), पुणेच्या नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म शाखेने याबाबतचे अधिकृत नियुक्तिपत्र जारी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार तसेच ११ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेतील तरतुदींनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेवर खाणकामामुळे बाधित भाग आणि तेथील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. प्रतिष्ठानचा वार्षिक कृती आराखडाअर्थसंकल्प मंजूर करणे, विविध विकासकामांना मान्यता देणे, निधीचा योग्यपारदर्शक वापर सुनिश्चित करणे, तसेच मंजूर कामांचा वेळोवेळी आढावा घेणे, ही परिषदेची प्रमुख जबाबदारी आहे.

याशिवाय प्रतिष्ठानच्या वार्षिक अहवालासह लेखापरीक्षित खात्यांना मंजुरी देणे, निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे आणि खनिजबाधित नागरिकांच्या गरजांनुसार विकासकामांना प्राधान्य देणे, अशी महत्त्वाची भूमिका नियामक परिषद पार पाडते.

या नियुक्तीमुळे खनिजबाधित भागातील मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या कामांना अधिक प्रभावी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हा खनिज अधिकारी तथा सदस्य सचिव आनंद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने आमदार शंकर जगताप यांना नियुक्तिपत्र दिले आहे.

“जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार”

“जिल्हा खनिज प्रतिष्ठान, पुणेच्या नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. खनिजबाधित भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपलब्ध निधीचा योग्य व पारदर्शक वापर व्हावा, यासाठी प्राधान्याने प्रयत्न करेन.”

See also  "गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित करा!" ताम्हिणी-भोर-वरंधा घाट रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची मुख्यमंत्र्यांकडे
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!