काशिनाथ शिंदे : पिंपरी
नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे युवा फाउंडेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महा-जनआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री सिद्धिविनायक मंदिर, संभाजीनगर चिंचवड येथे होणार आहे.
शिबिरात नागरिकांसाठी सामान्य आरोग्य तपासणी, ताप, बीपी, शुगर व इतर आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच नेत्र व ऑर्थोपेडिक तपासणी, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू तपासणी व आवश्यक उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञांकडून तपासणी, बालरोग तज्ज्ञांकडून मुलांची मोफत तपासणी व उपचार, तसेच त्वचारोग तज्ज्ञांकडून त्वचेच्या विविध विकारांवर तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरात ईसीजी तपासणीचीही मोफत सुविधा उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे, शिबिरस्थळी आयुष्मान भारत कार्ड नोंदणी केंद्र सुरू करण्यात येणार असून पात्र नागरिकांना आयुष्मान भारत कार्डच्या माध्यमातून उपचाराच्या सुविधेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड/ओळखपत्र, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत आणावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“विनम्र आवाहन – आरोग्य हीच खरी संपत्ती!” या संदेशासह सर्व नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







