शिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धाव

आनंद दिघेंच्या सेवाव्रताची आठवण; शिवसैनिकांच्या घरच्या गणपतींचे दर्शन घेत जपला कार्यकर्त्यांशी जिव्हाळा

काशिनाथ शिंदे

ठाणे : राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसैनिकांच्या आग्रहाला मान देत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत विविध ठिकाणी श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भावी शिक्षक आमदार मंगेश चिवटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील अनेक शिवसैनिकांनी आपल्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी शिंदे यांना आग्रहाचे निमंत्रण दिले होते. कार्यकर्त्यांच्या या आग्रहाला प्रतिसाद देत शिंदे यांनी रात्री उशिरापर्यंत विविध ठिकाणी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. पहाटेपर्यंत त्यांचा हा दर्शन दौरा सुरू होता.

शिवसैनिक आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा ही शिवसेनेची परंपरा मानली जाते. ठाण्याचे धर्मवीर आनंद दिघे हे मध्यरात्रीपर्यंत शिवसैनिकांच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी जात असत. ‘धर्मवीर’ चित्रपटातही त्यांच्या या कार्यपद्धतीचे चित्रण करण्यात आले आहे. त्याच परंपरेची आठवण करून देणारा प्रसंग शिंदे यांच्या या गणपती दर्शन दौऱ्यात पाहायला मिळाला.

शिवसैनिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मान देणे आणि त्यांच्याशी थेट संवाद ठेवणे, या दिघे यांच्या कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न शिंदे करत असल्याची भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली.

गणरायाच्या दर्शनाच्या निमित्ताने रात्री उशिरापर्यंत शिवसैनिकांच्या घरी पोहोचलेल्या शिंदे यांच्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दिघे यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा प्रसंग ठाण्यातील शिवसैनिकांसाठी विशेष ठरला.

See also  रोजगार मेळ्यांतून तरुणांसाठी संधींची दारे खुली : सचिन अहिर
  • Related Posts

    ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने

    काशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहून कर्तृत्ववान शिक्षकांचा गौरव…

    ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

    पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची अखेर; वयाच्या ८१व्या वर्षी निधन काशिनाथ  शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव अमृतराव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने

    ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने

    ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

    ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन

    आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका

    आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!

    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!

    सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा दिमाखदार प्रारंभ