रात्री १२ वाजण्यापूर्वी डीजेमुक्त, शांततामय आणि शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक
काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड
रुपीनगर : श्रद्धा, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या रुपीनगरमधील गणेशोत्सवाने यंदा एक नवा आदर्श निर्माण केला. रुपीनगरच्या २६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच वंदे मातरम् चौकातून गणेश विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजण्यापूर्वी, पूर्णपणे डीजेमुक्त, शांततामय आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
ही मिरवणूक शांततेत आणि शिस्तीत पार पडण्यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन केले. पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयामुळे गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत सुरक्षित वातावरणात विसर्जन मिरवणूक पूर्ण झाली.
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत शांतता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जपण्याचा संदेश यंदाच्या मिरवणुकीतून देण्यात आला. सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी आणि जागरूक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत मिरवणूक वेळेत पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या संपूर्ण प्रक्रियेत चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत जाधव, तसेच रुपीनगरचे PSI देवकर आणि PSI बाबर यांचे नियोजन, मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वाचे ठरले. पोलीस प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे मिरवणुकीदरम्यान शिस्त आणि सुरक्षितता कायम राहिली.
तसेच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल नागरिकांकडून कौतुक व्यक्त करण्यात आले. पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयातून गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात पार पडली.
रुपीनगरच्या नागरिकांनी दाखवलेली सामाजिक जाणीव, संयम आणि प्रशासनाला दिलेले सहकार्य ही यंदाच्या गणेशोत्सवाची विशेष ओळख ठरली. उत्सवाचा जल्लोष कायम ठेवतानाच ध्वनिप्रदूषण टाळणे, वेळेचे भान ठेवणे आणि सामाजिक जबाबदारी जपणे शक्य आहे, हे रुपीनगरकरांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
उत्सव मोठा असण्यासोबतच तो संस्कृती, शांतता आणि सामाजिक जबाबदारी जपत साजरा होणे हीच खरी गणेशभक्ती आहे. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतून रुपीनगरने ही भावना प्रत्यक्षात उतरवून एक आदर्श निर्माण केला.
रुपीनगरच्या या ऐतिहासिक आणि आदर्शवत गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व गणेश मंडळे, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांच्यासह संपूर्ण पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात येत आहेत.







