आळंदीतून दोन तडीपार आरोपी ताब्यात
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : तडीपार, पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान आळंदी परिसरातून दोन तडीपार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने केली.
युनिट-३चे पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर आणि दिलीप राठोड हे तडीपार, पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. आळंदी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील तडीपार आरोपी आळंदी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तत्काळ कारवाई केली.
पथकाने पीसीएस चौक, आळंदी, पुणे येथून शुभम अशोकराव लोंढे (वय २२, रा. दत्त मंदिराजवळ, केंद्रे महाराज मठ, आळंदी, पुणे) आणि केशव उद्धव दौंड (वय १९, रा. गणेश वाटिकेसमोर, केंद्रे महाराज मठाजवळ, आळंदी, पुणे) या दोन्ही तडीपार आरोपींना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना आळंदी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई संतोष कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-३, पिंपरी-चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.







