स्थानिक कलाकारांच्या कलेला मिळाले हक्काचे व्यासपीठ; दिवाळी पहाट उत्साहात संपन्न!

आमदार अण्णासाहेब बनसोडे व नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्या सौजन्याने सांस्कृतिक मेजवानी; अभिनेत्री भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे यांच्या पुढाकारातून स्थानिक कलावंतांचा गौरव

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णासाहेब दादू बनसोडे आणि प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक सिद्धार्थ अण्णासाहेब बनसोडे यांच्या सौजन्याने अखिल पिंपरी-चिंचवड कलामंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेली दिवाळी पहाट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि फराळ वाटपाचा सोहळा उत्साहात पार पडला. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अभिनेत्री भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात शहरातील स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले.

दिवाळीच्या मंगलमय वातावरणात झालेल्या या सांस्कृतिक सोहळ्यात अभंग, भक्तिगीते, भावगीते, हिंदी-मराठी गीते, लावणी, लोकगीते आणि काव्यरचना अशा विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी आपल्या कलागुणांची चमक दाखवत उपस्थित रसिकांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचे सुंदर दर्शन यानिमित्ताने घडले.

कार्यक्रमाला पत्रकार मुज्जफर इनामदार, आंतरराष्ट्रीय गायक चंद्रकांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जगताप, चित्रपट निर्माते सूर्यकांत पवार आणि कीर्तनकार पुरुषोत्तम हिंगणकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.

यावेळी भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे म्हणाल्या, की आमदार अण्णासाहेब बनसोडे हे पिंपरी-चिंचवडमधील कलाकारांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहतात. कलाकारांना प्रोत्साहन देणे, त्यांना संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांचे सातत्याने सहकार्य लाभते. त्यामुळे ते अखिल पिंपरी-चिंचवड कलामंचचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. तसेच कार्यक्रमासाठी अल्पावधीत सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉल्फिन्स गार्डन स्टुडिओ, सांगवीचे सर्वेसर्वा राज सोमवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.

आज अनेक कलाकारांकडे उत्तम कला आणि गुणवत्ता असूनही त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. हीच उणीव दूर करण्यासाठी स्थानिक कलाकारांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांच्या कलेला सन्मान आणि ओळख मिळवून देणे हा कलामंचचा मुख्य उद्देश आहे. यापुढेही कलाकारांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास घेवारे यांनी व्यक्त केला.

See also  अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

कलाकारांच्या सादरीकरणाने रंगली दिवाळी पहाट

गायन क्षेत्रात विद्या गायकवाड नढे, गायत्री साळवे, अशोक टाकळे, मनीषा इंगोले, जगन्नाथ खाडे, शेखर चांदणे, अमित देशमाने, प्रतीक सत्वाधीर, रेखा दुसाने, कोमल भोसले, सागर डाडर, संतोष माहेश्वरी, प्रमोद कुलकर्णी, सविता कोरडे, कविता तळेकर, मनीषा सपकाळे आणि सुरेखा कुलाल यांनी सुमधुर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

वाद्यवृंदामध्ये सेन कुमार, श्रीराम इंगळे, अशोक जाधव, विलास अडागळे, सोमनाथ कांबळे, राजकुमार काजोरिया, लखन अडागळे, गोकुळ आणि रोहन कळदकर यांनी सुरेल साथ दिली. वृषाली सातपुते, भारती मोरे, सुजाता कुंभार आणि फिरोज मुजावर यांनी बहारदार लावणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

महाराष्ट्राची लोकधारा या विशेष सादरीकरणात रवी कांबळे, सँडी पाटील, सिद्धांत घागरमले, कावेरी गंगाळे, आकाश गायकवाड, रवींद्र शिंदे, लीनेश घाडगे, अमोल अडागळे आणि भाऊसाहेब सांगळे यांच्या समूहाने लोककलेचा सुंदर आविष्कार सादर केला.

कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था सुनील पाटील टेक्नॉलॉजी साऊंड यांनी सांभाळली, तर लीनेश घाडगे आणि विक्रांत शिंदे यांनी निवेदनाची जबाबदारी पार पाडली. प्रकाश नवगिरे, मनीषा बाराथे, मेबल अल्ल्हाट, मंगला पवार आणि मोनिका शिंदे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष योगदान दिले.

स्थानिक कलाकारांना एकत्र आणून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, कलाकार, पदाधिकारी, सदस्य आणि रसिक श्रोत्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.

  • Related Posts

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    ४.९२ लाखांचे २४.६३ ग्रॅम मॅफेड्रॉन हस्तगत; रिक्षा, मोबाइल आणि रोख रकमेसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : गुलटेकडी येथील मार्केटयार्ड परिसरात अमली…

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    मोशीतील इंद्रायणी नदीच्या तीरावर विश्व श्रीराम सेनेच्या छटपूजा महोत्सवात भक्तीचा जनसागर; १५ हजार भाविकांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये सूर्यनारायणाच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक