पिंपरी-चिंचवडचा स्वच्छतेत राज्यात डंका! महाराष्ट्रात प्रथम क्रमांकासह राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विज्ञान भवनात सन्मान; महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वीकारला पुरस्कार

सफाई सेवकांचे अहोरात्र परिश्रम, महापालिकेचे नियोजन आणि नागरिकांच्या सहभागाला राष्ट्रीय स्तरावर गौरव

काशिनाथ शिंदे

पिंपरी : स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घवघवीत यश संपादन करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात सर्वोत्तम कामगिरी करत शहराने राज्यातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा बहुमान मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली असून, नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महापालिकेला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महापालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल उपस्थित होते. केंद्रीय मंत्री मनोहर लाल, केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू यांच्यासह केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते.

या पुरस्कारामुळे पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी महापालिकेने केलेले नियोजन, प्रशासकीय यंत्रणेचा समन्वय, सफाई सेवकांचे अथक परिश्रम आणि नागरिकांचा वाढता सहभाग या यशाचे प्रमुख आधार ठरले आहेत

.कचरा व्यवस्थापनाला शिस्त; स्वच्छतेला लोकचळवळीचे स्वरूप

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ महापालिका यंत्रणेवर अवलंबून न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेची सवय रुजविण्यावर प्रशासनाने भर दिला. घराघरांतून ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्रपणे संकलित करणे, नियमित कचरा उचलणे, शास्त्रोक्त प्रक्रिया आणि पुनर्वापर यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

आर.आर.आर. केंद्रांच्या माध्यमातून वापरण्यायोग्य वस्तूंचा पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात आले. रस्ते, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे आणि नागरी सुविधांच्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनाही या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात आले

See also  वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा; नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप यांची मागणी

.विभागीय समन्वयातून स्वच्छतेला गती

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या समन्वयातून स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

आरोग्य विभागासह जलनिस्सारण, पाणीपुरवठा, स्थापत्य, विद्युत, पर्यावरण आणि उद्यान विभागांनीही या कामात महत्त्वपूर्ण योगदान दिले. क्षेत्रीय स्तरावर सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांनी स्वच्छता कामांचे नियोजन व देखरेख केली.

सफाई सेवकांच्या कष्टांना राष्ट्रीय पातळीवर सलाम

या यशामागे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या सफाई सेवकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता अहोरात्र शहर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम या पुरस्काराचे खरे मानकरी ठरले आहेत. सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आणि निवासी परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांनी सातत्याने पार पाडली. त्यांच्या समर्पित सेवेचा राष्ट्रीय पुरस्काराच्या माध्यमातून गौरव झाला आहे.

“पिंपरी-चिंचवड महापालिकेला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळणे हा संपूर्ण शहराच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. प्रशासन, सफाई सेवक आणि नागरिक यांच्या एकत्रित सहभागातून हे यश मिळाले आहे. स्वच्छता सेवकांच्या श्रमांचा सन्मान आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे शहराला राष्ट्रीय स्तरावरही गौरव मिळाला आहे. आगामी काळातही स्वच्छतेचे हे स्थान कायम राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले,

“स्वच्छ सर्वेक्षणातील महाराष्ट्रातील प्रथम क्रमांक ही शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत सातत्याने घडवून आणलेल्या सकारात्मक बदलांची पोचपावती आहे. नियोजनबद्ध कार्यपद्धती, विविध विभागांमधील समन्वय, तंत्रज्ञानाचा वापर आणि क्षेत्रीय स्तरावरील देखरेख यामुळे स्वच्छता व्यवस्थेला अधिक सक्षम स्वरूप प्राप्त झाले आहे.

या यशात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई सेवकांचा आणि स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या नागरिकांचा मोठा वाटा आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान आम्हाला अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा देणारा आहे. पिंपरी-चिंचवडला स्वच्छता आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात देशासाठी आदर्श शहर बनविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

See also  एसबीपीसीओएडीमध्ये ४३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही या यशामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांसह सफाई सेवक आणि नागरिकांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.

महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आणि राष्ट्रीय पुरस्काराच्या दुहेरी सन्मानामुळे पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छता व्यवस्थेची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे. मात्र, मिळालेल्या यशावर समाधान न मानता स्वच्छतेचा दर्जा अधिक उंचावणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेची लोकचळवळ अधिक व्यापक करणे, हेच महापालिकेसमोरील पुढील आव्हान असणार आहे.

  • Related Posts

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले आकाशकंदील अन् रंगविले दिवे; विक्रीतून मिळालेला निधी अनाथाश्रम आणि दिव्यांग संस्थेला भेट काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे: शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये…

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीचा उपक्रम; मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड: देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या