कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निलेश हाके यांचा पुढाकार; फुगेवाडी स्मशानभूमीत सुरक्षा केबिन भेट!

एकनाथ हाके व शिवाजी बोधले यांच्या हस्ते सुरक्षा केबिनचे उद्घाटन; सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम

काशिनाथ शिंदे

फुगेवाडी, पुणे : सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे भान जपत फुगेवाडी येथील स्मशानभूमीत अहोरात्र सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी श्री. निलेश एकनाथ हाके यांनी पुढाकार घेत सुरक्षा केबिन भेट दिली आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

स्मशानभूमीमध्ये दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांना कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने ही सुरक्षा केबिन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुरक्षा केबिनचे उद्घाटन निलेश हाके यांचे वडील आदरणीय एकनाथ हाके आणि श्री. शिवाजी बोधले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन श्री. विनोद शिंदे, श्री. भरत हुलावळे आणि श्री. उल्हास तात्या जाधव यांनी केले.

समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि गरजूंना मदतीचा हात देणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून निलेश हाके यांनी केलेला हा पुढाकार निश्चितच समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारा ठरत आहे.

सेवा हीच खरी समाजाची बांधिलक

See also  इतिहासाची ज्योत विद्यार्थ्यांच्या मनात प्रज्वलित करणारे संभाजी बो-हाडे सर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित!
  • Related Posts

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    ४.९२ लाखांचे २४.६३ ग्रॅम मॅफेड्रॉन हस्तगत; रिक्षा, मोबाइल आणि रोख रकमेसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : गुलटेकडी येथील मार्केटयार्ड परिसरात अमली…

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    मोशीतील इंद्रायणी नदीच्या तीरावर विश्व श्रीराम सेनेच्या छटपूजा महोत्सवात भक्तीचा जनसागर; १५ हजार भाविकांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये सूर्यनारायणाच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक